Israel–Hamas war 
ग्लोबल

Israel–Hamas war: संकटात सापडलेल्या पॅलेस्टिनींसाठी भारताचा मदतीचा हात, गाझामध्ये पाठवली मोठी मदत

Sandip Kapde

Israel–Hamas war:   इस्त्राइल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनींना मोठी मदत पाठवली आहे. इस्राइलसोबतच्या युद्धात दोन्ही बाजूंनी हजारो लोकांचा बळी गेला आहे. यावेळी हमास आणि इस्त्राइल युद्धात पॅलेस्टिनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने आज गाझामधील पॅलेस्टिनींना वैद्यकीय मदत आणि आपत्ती निवारण साहित्य पाठवले. ही मदत शनिवारी इजिप्तमधून गाझामध्ये पाठवल्या गेली. (Latest Marathi News)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली आहे. "भारताने पाठवलेल्या मदतीत जीवनावश्यक औषधे, शस्त्रक्रिया वस्तू, तंबू, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे"

इस्राइली सैन्याने हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझावर हल्ले केले होते. ज्यात  कमीतकमी 1,400 लोक मारले गेले.  हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काउंटर स्ट्राइकमध्ये 4,300 हून अधिक पॅलेस्टिनी, प्रामुख्याने स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. (Latest Global News)

गाझामध्ये स्थानिक नागरिकांच्या म्हणन्यानुसार त्यांना कोठे जायचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे याबद्दल खात्री नाही. तसेच  इजिप्तमधील शांतता परिषदेत संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धविराम करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT