Israeli Air Strike 
ग्लोबल

Israeli Air Strike: इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार

Sandip Kapde

Israeli Air Strike: इस्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. शनिवारी हसामच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर आचानक हल्ला केला आहे. यामध्ये इस्राइल मधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्राइलने देखील हमास दहशतवाद्यांना कडवे उत्तर दिले. दरम्यान एका अहवालानुसार मोठी माहिती समोर आली आहे. इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवादी इस्लामी गट हमासचा संस्थापक गाझावरील इस्राइली हल्ल्यात मंगळवारी ठार झाल्याची नोंद झाली आहे. इस्राइलच्या कॅन पब्लिक ब्रॉडकास्टरने पॅलेस्टिनी अहवालाचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

अब्दुल-फताह दुखान, ज्याला "अबू ओसामा" म्हणून ओळखले जाते. याचा मध्य गाझामधील नुसीरत शेजारच्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. यापूर्वी इस्त्राइलच्या गाढावरील ड्रोन हल्ल्यात हमासचे अर्थमंत्री आणि  पॉलिटब्युरोच्या वरिष्ठ सदस्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला होता.

अल-नुसैरत निर्वासित शिबिरातील शाळेचे मुख्याध्यापक दुखान डिसेंबर 1987 च्या गाझा येथील मुस्लिम ब्रदरहूडच्या बैठकीत उपस्थित असलेल्यांपैकी एक होते. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात अंदाजे 1,200 इस्राइली मारले गेले होते. तर इस्राइलने गाझावर केलेल्या प्रतिहल्यात अंदाजे 1,050 पॅलेस्टिनी मरण पावले होते. (Latest Global News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT