ग्लोबल

Israeli strikes on Palestinian : ईस्राईलचा पॅलेस्टिनींवर हवाई हल्ला; पाच जणांचा मृत्यू, दहशतवादी कुरापतींचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः इस्रायली सुरक्षा दलांनी मध्यरात्री पॅलेस्टाईनमध्ये जेनिन शहरातील निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय.

काल रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले सुरु होते. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. स्थानिकांनी सांगितलं की, इस्राईलने सोमवारी पहाटे जेनिनमध्ये किमान १० हवाई हल्ले केले. अल जझीरानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इस्रायली वाहनांचा ताफा स्थानिकांना रस्त्यावरुन जातांना दिसला होता. या हल्ल्यानंतर निर्वासित छावणीच्या ढिगाऱ्यातून धूर निघतांना अनेकांनी पाहिला. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने रविवारी आणि सोमवारच्या मध्यरात्री सांगितले की, जेनिन भागामध्ये दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

मंत्रालयाने सोमवारी सकाळी सांगितले की, जेनिन शहरात तीन, रामल्ला शहरात एक ठार झाला आहे. या घटनेत १० हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

मध्य वेस्ट बँकमधील रामल्ला शहराच्या उत्तर प्रवेशद्वारावर इस्रायली सैन्याने आणखी एक पॅलिस्टिनीला मोहम्मद हसनैन याला ठार केले. मात्र इतर चार लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. या हल्ल्यात आणखी २७ पॅलेस्टिनी नागरीक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जिथे इस्रायने हल्ला केला तिथे दहशतवादी कायवायांसाठीची सामुग्री होती, अशी माहिती इस्रायलकडे होती. तेथे शस्त्रास्त्रे आणि स्फोटके ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम होतं. याच भागामध्ये ईस्रायने पूर्वीही हल्ले केले होते. २००६ नंतरचा हा पहिला ड्रोन हल्ला आहे. जेनिन आणि उत्तर पॅलिस्टिनी प्रदेशांवर लष्करी हल्ले आणि गावांवर हवाई हल्ले झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT