WHO Statement on Omicron Variant File Photo
ग्लोबल

कोरोनाचा खेळ खल्लास? WHO म्हणतं, 'ओमिक्रॉन हा शेवटचा...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या विषाणूने माणसांच जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत असून संपूर्ण जगच या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूमुळे वेठीला धरलं गेलं आहे. भारतात सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे ती आल्याचं तज्ज्ञ सांगतात. कोरोना या विषाणूचे अनेकानेक व्हेरियंट प्रसारित होत असून डेल्टानंतर आता ओमिक्रॉनचा धुमाकूळ पहायला मिळतो आहे. (Omicron Variant Corona)

डेल्टा या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनची लाट तशी सौम्य असल्याचं दिसून येतंय. त्याच्या संसर्गाची संख्या तीव्र असली तरीही गंभीर होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, ओमिक्रॉन हा आता शेवटचा व्हेरियंट असेल का? अशी चर्चा सुरु आहे. कोरोनाचा हा सगळा खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून आता त्याचा समारोप जवळ आलाय का? अशीही शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.(WHO Statement on Omicron Variant)

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट असेल किंवा आपण आता कोरोनाचा शेवटचा खेळ खेळत आहोत, असे मानणे धोकादायक आहे.

कोरोना या विषाणूची आता पर्यंत जगभरात सुमारे ३५.१ कोटी लोकांना बाधा झाली आहे. तर जगभरात ५६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णंसंख्येमध्ये आणि कोरोनाच्या मृत्यूसंख्येमध्ये जगभरात अमेरिकेचा क्रमांक पहिला लागत असून त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत ३.९५ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ४.९ लाख म्हणजेच जवळपास पाच लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज; परस्पर भेटीचा निर्णय घेतल्याने केली विचारणा

रजत पाटीदार कर्णधार, रिंकू सिंगकडे उप कर्णधारपद; मोठ्या स्पर्धेसाठी जाहीर झाला तगडा संघ... नेमक्या केव्हा होणार या लढती?

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी; RBIच्या योजनेने आणले ४०.८१ अब्ज डॉलर; एका निर्णयाने बदललं चित्र

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांचा धाक संपला, गुंडांचा बंदोबस्त करा; अन्यथा...; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

SCROLL FOR NEXT