Shinzo Abe  Sakal
ग्लोबल

Shinzo Abe Death: ...म्हणून शिंजो आबे चीनच्या डोळ्यात खुपत होते

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळापूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज गोळीबार (Firing) करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळापूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. जपानच्या नारा शहरात सुरू असलेल्या भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटकाही आला होता. आबे यांच्या हत्येनंतर जगभरातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. मात्र, दुसरीकडे चीनमध्ये (China) आबे यांच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त करण्याऐवजी आनंदी झाला आहे. चिनी सोशल मीडियावर (Social Media) शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा केला जात आहे. असे करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया. (Shinzo Abe News In Marathi)

चीनच्या धोरणांना उघडपणे विरोध

चीनची नेहमीच इतर देशांच्या सीमेवर नजर असते, चीनच्या या कृतीमुळे भारतासह सर्व शेजारी देशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. चीनने जगातील कोणत्याही देशावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिंजो आबे यांनी उघडपणे विरोध केला.

क्वाडच्या स्थापनेमुळे चीन झाला होता त्रस्त

जपानचे (Japan) पंतप्रधान असताना शिंजो आबे यांनी अनेक असे निर्णय घेतले जे चीनसाठी धोकादायक ठरले किंवा या निर्णयांमुळे चीनच्या अनेक वाईट योजना उद्ध्वस्त झाल्या. जगातील सर्वात प्रसिद्ध नेत्यांपैकी एक, शिंझो आबे यांनी क्वाडचा आरंभ केला. जो भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा समूह आहे. शिंजो आबे यांची चीनवरील ही सर्वात मोठी जखम होती. जेव्हा क्वाडची स्थापना झाली तेव्हा चीनने त्याला उघड विरोध करत ही त्यांच्या विरोधात कट रचून केलेली कृती असल्याचे म्हटले होते.

शिंजो आबे यांच्या पुढाकारानंतर क्वाडची (Quad ) निर्मीती झाली होती. यामागचा मुख्य उद्देश चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. याला विरोध करण्यासाठी चीनने क्वाड सदस्य देशांशीही चर्चादेखील केली होती. याशिवाय ज्या ज्यावेळी क्वाड सदस्य देशांचे सैन्य सराव करत किंवा धोरणात्मक बैठक घ्यायचे त्यावेळी चीनचा मोठा तिळपापड होत होता.

गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे हे प्रदीर्घ आजाराला तोंड देत होते. त्यावेळी जगातील सर्व देश ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, आबे आजारी पडणे चीनसाठी दिलासा देणारे होते. त्यात आज त्यांचा गोळीबारात मृत्यू झाला त्यामुळे चीनच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आबे यांच्यावरील हल्ल्यानंतर चीनच्या सोशल मीडियावर आनंद साजरा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT