esakal
ग्लोबल

आबेंपूर्वी झाला होता एका माजी पंतप्रधानावर हल्ला; नेव्ही ऑफिसरनं घेतले होते प्राण

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या नारा शहरात हल्ला झाला.

धनश्री ओतारी

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी जपानच्या नारा शहरात हल्ला झाला. निवडणूक प्रचारादरम्यान अज्ञातांनी त्यांच्यावर दोनदा गोळ्या झाडल्या. त्याच्या प्रकृतीबाबत सध्या वेगवेगळी माहिती समोर येत आहे. दरम्यान, जपानच्या पंतप्रधानांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वीही जपानच्या पंतप्रधानांवर हल्ला झाला होता. इनुकाई सुयोशी असे त्या पंतप्रधानांचे नाव आहे. (before shinzo abe prime minister inukai suyoshi was attacked)

जपानमध्ये 1932 मध्ये एक घटना घडली होती ज्यामध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याने जपानच्या पंतप्रधानांची हत्या केली होती. 15 मे 1932 रोजी तत्कालीन पंतप्रधान इनुकाई सुयोशी यांच्यावर नौदलाच्या एका तरुण अधिकाऱ्याने हल्ला केला होता.

आजही जपान आणि जगाच्या इतिहासात ही घटना ५.१५ घटना म्हणून ओळखली जाते. हा हल्ला जपानमधील सत्तापालटाच्या प्रयत्नाचा परिणाम होता. या हल्ल्यात इंपीरियल जपानी आर्मीचे कॅडेट्सही सामील होते. लीग ऑफ ब्लड नावाच्या अतिरेकी संघटनेचे लोकही या हल्ल्यात होते.

पीएम सुयोशी यांच्यावर नौदलाच्या 11 अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला जपानच्या लोकांनी खूप पाठिंबा दिला होता. त्यामुळे मारेकऱ्यांना फार कमी शिक्षा झाली. त्यानंतर जपानमध्ये लष्कराचा दबावही वाढला आणि लोकशाही कमकुवत झाली. ही घटना जपानी राजेशाही कमकुवत करणारी देखील मानली जाते.

सुयोशीच्या हत्येनंतर, 22 मे 1932 रोजी, नौसेना अॅडमिरल सायटो माकोटो यांना देशाचे पुढील पंतप्रधान बनवण्यात आले. सायटोने राष्ट्रीय एकता मंत्रिमंडळ एकत्र केले. यात नोकरशहांव्यतिरिक्त दोन मोठ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. तेव्हापासून जपानने कधीही पूर्णपणे एक-पक्षीय मंत्रिमंडळ व्यवस्था पाहिली नाही. मात्र, युद्धानंतर ही व्यवस्था बदलली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT