Japan issues tsunami 
ग्लोबल

Earthquake in Japan: जापानमध्ये 6.6 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या भीतीने हाय अलर्ट जारी

कार्तिक पुजारी

टोकियो Earthquake in Japan- जापानमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे देशातील इझू बेटावर त्सुनामीचा धोका निर्माण झालाय. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इझू बेटांवर एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. याशिवाय पूर्वेस चिबा प्रीफेक्चरपासून पश्चिमेला कागोशिमा प्रीफेक्चरपर्यंत ०.२ मीटर पर्यंतच्या लाटांची शक्यता व्यक्त करण्यात आलीये.

भूकंपाचे धक्के गुरुवारी ११ वाजल्यापासून जाणवत आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ अशी नोंद झाली आहे. भूकंपाचे धक्के इझू बेट समुगांच्या तोरीशिमाच्या जवळ १० किलोमीटर खोल जाणवले आहेत. त्यामुळे किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना अलर्ट करण्यात आले आहे. त्यांना उंच ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.ज

जापानमध्ये भूकंप नेहमीचा

जगातील सर्वात जास्त भूकंपाचे धक्के जापानमध्ये जाणवतात. जापानमध्ये २०११ मध्ये आलेल्या भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. त्युनामीने जापानच्या उत्तर भागात मोठा विध्वंस झाला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा आण्विक भट्टीला मोठे नुकसान झाले होते. भट्टीतील कूलिंग वॉटर रेडियोअॅक्टिव पदार्थ पाण्यात मिसळले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT