joe biden yoshihide suga Sakal
ग्लोबल

चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दोन देशांमधील संबंध दृढ असल्याची ग्वाही देण्याबरोबरच चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात चीन-अमेरिका एकत्र असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पीटीआय

वॉशिंग्टन - जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दोन देशांमधील संबंध दृढ असल्याची ग्वाही देण्याबरोबरच चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात चीन-अमेरिका एकत्र असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रथमच एखाद्या राष्ट्रप्रमुखाची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

बायडेन आणि सुगा यांच्यात आज कोरोना नियमांचे पालन करत बैठक झाली. द्वीपक्षीय चर्चेबरोबरच चीनपासून अमेरिका-जपानला आणि एकूणातच जगाला असलेल्या धोक्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. चीनचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य, त्याबळावर त्यांनी स्वीकारलेले आक्रमक धोरण यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुगा यांनी चीनला थेट इशारा दिला. ‘हिंदी-प्रशांत सागरात अनावश्‍यक वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आळा घातला जाईल. यासाठी जपान आणि अमेरिका संयुक्तपणे प्रयत्न करतील. या भागातील शांतता आणि स्थैर्य बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष निर्माण होऊ शकतो,’ असा इशारा सुगा यांनी दिला. जपानच्या संरक्षणासाठी आणि स्थैर्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन बायडेन यांनी दिले.

बायडेन यांच्याबरोबरील चर्चेत सुगा यांनी तैवानमधील अशांततेचा मुद्दाही उपस्थित केला. तैवानच्या मुद्यावर जपानने १९६९ नंतर प्रथमच जाहीरपणे वक्तव्य केले आहे. जपानने आतापर्यंत शेजाऱ्यांशी शांततेचे धोरण स्वीकारले होते. मात्र, सुगा यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा देश आक्रमक झाला असून त्यांनी चीनला उघड विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

हा तर विभाजनाचा प्रयत्न : चीन

जपान आणि अमेरिकेदरम्यान चीनचा मुद्दा उपस्थित झाल्याबद्दल चीन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. हा विभाजनाचा प्रकार असल्याचे चीनने म्हटले आहे. ‘मुक्त आणि खुल्या’ वातावरणाच्या नावाखाली देशांचे छोटे गट तयार करून कोणा एका देशाला लक्ष्य करण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचे चीनच्या वॉशिंग्टनमधील दूतावासाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT