Daisuke Hori esakal
ग्लोबल

जगावेगळे! तब्बल 12 वर्षांपासून 'ही' व्यक्ती रोज झोपते फक्त 30 मिनिटेच

बाळकृष्ण मधाळे

टोकियो (जपान) : निरोगी शरीरासाठी दिवसातून किमान 7-8 तास झोपणं खूप महत्वाचं आहे. पण, जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं हे खोटं ठरवलंय. तो, गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण दिवसांत फक्त 30 मिनिटे झोपतो आणि त्याचं शरीरही पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

निरोगी शरीरासाठी दिवसातून किमान 7-8 तास झोपणं खूप महत्वाचं आहे.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव देसुकी होरी (Daisuke Hori) असं आहे. देसुकीनं सांगितलं, की पूर्वी तो दिवसाला 8 तासाहून अधिककाळ झोपायचा, पण हळूहळू त्यानं झोपेची वेळ कमी करण्यास सुरुवात केली आणि अवघे 30 मिनिटे तो झोपू लागला. गेली 12 वर्षे तो दिवसातून फक्त अर्धा तासच झोपत आहे.

देसुकी हा जपान शॉर्ट स्लीपर असोसिएशनचा (Japan Short Sleeper Association) अध्यक्ष असून त्यानं कमी झोपेनेही कसे तंदुरुस्त राहता येतं, याचे शेकडो लोकांना धडे दिले आहेत. या शिकवणीमुळे लोकांच्या जीवनशैलीत खूपच चांगला बदल झाल्याचे पहायला मिळतेय, असं तो सांगतो. त्याचं असं मत आहे, की जास्त वेळ झोपेला दिल्यामुळे काम कमी होतं, त्यामुळे त्यानं हा मार्ग स्वीकारलाय. जर, तुम्ही दिवसातून 8 तास झोपत असाल, तर तुम्हाला हवे ते मिळू शकत नाही. यानंतर त्याने झोपेचे तास कमी करण्यास सुरुवात केली. काही वर्षांच्या सरावानंतर, त्यानं आपली झोप कमी केली आणि आता तो फक्त 30 मिनिटे झोपतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT