Hamas Hostages 199 People esakal
ग्लोबल

Hamas Hostages 199 People : ज्यू की ख्रिश्चन...हमासने ओलीस ठेवलेले 30 देशांतील 199 लोक कोण आहेत?

हल्ल्यानंतर हमासने सुमारे 199 लोकांचं अपहरण केलं

सकाळ डिजिटल टीम

Hamas Hostages 199 People : सोमवारी माहिती देताना इस्रायली एजंसीने सांगितले की, हल्ल्यानंतर हमासने सुमारे 199 लोकांचं अपहरण केलं आहे. मात्र पूर्वी हा आकडा 155 होता, तो आता वाढला असून इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "आम्ही 199 ओलिसांच्या कुटुंबांना माहिती दिली आहे."

इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता गाझामधील नागरिकांच्या घरांवर बॉम्बफेक सुरू ठेवल्यास पोलिसांना ठार मारण्याची धमकी हमासने दिली आहे. इस्रायलचे ऊर्जा मंत्री म्हणाले की, सर्व ओलीस मायदेशी परत येत नाहीत तोपर्यंत गाझाला पाणी आणि अन्नाची मदत दिली जाणार नाही.तुर्कीला दिलेल्या संदेशांमध्ये, हमासने म्हटलंय की जोपर्यंत इस्रायल बॉम्बफेक थांबवत नाही आणि हजारो कैद्यांची सुटका करत नाही तोपर्यंत ते ओलिसांच्या देवाणघेवाणीचा विचार करणार नाहीत.

ओलिस कोण आहेत?

हमासच्या ताब्यात असलेल्यांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. हे लोक 30 देशांमधून आले आहेत. अपहरण झालेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज बदलला असून त्यात सहभागी असलेल्या देशांची संख्याही वाढली आहे. ओलिसांपैकी बहुतेकांकदे इस्त्रायलींसह दुहेरी नागरिकत्व असण्याची शक्यता आहे. हे ओलीस ज्यू आणि ख्रिश्चन असू शकतात, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

ओलीस कुठे आहेत?

हमासने माहिती देताना सांगितलंय की, दहशतवाद्यांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायली कारवायांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी गाझामधील विविध ठिकाणी ओलीस ठेवण्यात आले आहेत. हमासने सांगितलं की, अलीकडच्या काही दिवसांत गाझामध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात या गटाने पकडलेले 22 लोक मारले गेले आहेत.

यावर लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, "ओलिस ठेवलेल्या लोकांना परत आणण्यासाठी सैन्य आणि इस्रायल चोवीस तास काम करत आहेत."दोन्ही बाजूंच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार इस्रायलमध्ये किमान 1,400 लोक मारले गेले आहेत आणि गाझावरील प्रत्युत्तरात 2,750 लोक मारले गेले आहेत. हल्ल्यांनंतर सुमारे 1,500 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

इस्रायलचा हिजबुल्लाला इशारा

इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) लेबनीज शिया मिलिशिया हिजबुल्लाला इशारा देताना म्हटलंय की, इस्रायलवर हल्ले सुरू ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.कडॅनियल हगारी म्हणाले, "आम्ही उत्तरेकडील सीमेवर आमचे सैन्य वाढवले आहे आणि आमच्याविरुद्धच्या कोणत्याही हालचालींना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल. हिजबुल्लाहने आमची परीक्षा घेण्याचे धाडस केले तर त्याचा प्रतिसाद घातक असेल. अमेरिका आम्हाला पूर्ण पाठिंबा देत आहे.

आयडीएफने म्हटलंय की ते लेबनीज सीमेपासून चार किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र "वेगळे" करत आहे आणि नागरिकांना या भागात प्रवेश करण्यास बंदी घालत आहे. इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या गोळीबाराच्या वेळी हे घडले. इराण-समर्थित मिलिश्यांनी इस्रायली सीमावर्ती भागांवर तीन हल्ले केले, परिणामी एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.

यावर हमासने प्रत्युत्तर देताना म्हटलंय की, "कोणतीही महान शक्ती असो, अरब देश, संयुक्त राष्ट्रांचे दूत पडद्याआडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आम्हाला हस्तक्षेप न करण्यास सांगत असले तरी कोणताही परिणाम होणार नाही. हिजबुल्लाला त्यांची कर्तव्यं चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. आम्ही तयार आहोत आणि पूर्णपणे तयार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT