google
google esakal
ग्लोबल

Covid लस न घेतलेल्या Google कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात!

सकाळ वृत्तसेवा

कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गूगल पगार देणार नाही.

कोविड (Covid-19) नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गूगल (Google) पगार देणार नाही. एवढेच नाही तर कर्मचाऱ्याने कोविडची लस (Covid Vaccine) घेतली नसल्यास त्याची नोकरीही (Jobs) जाऊ शकते. Google ने अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी मेमो काढला आहे. सीएनबीसी या वृत्तवाहिनीने मंगळवारी अंतर्गत दस्तावेजांचा हवाला देत हा दावा केला आहे. गूगलने वर्क फ्रॉम होम सुविधा संपवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता तो निर्णयही पुढे ढकलला आहे. (Jobs of Google employees who have not been vaccinated against Corona are at stake)

रिपोर्टनुसार, Google ने दिलेल्या मेमोमध्ये असे म्हटले आहे, की कर्मचाऱ्यांना 3 डिसेंबरपर्यंत लसीकरणाची स्थिती घोषित करणे आणि पुरावे दर्शविणारी कागदपत्रे अपलोड करणे किंवा वैद्यकीय किंवा धार्मिक सूटसाठी अर्ज करणे आवश्‍यक आहे. अलीकडच्या आठवड्यात सुमारे 40 टक्के अमेरिकन कर्मचारी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कार्यालयात परतले आहेत, परंतु आता ओमिक्रॉनमुळे पुन्हा वर्क फ्रॉम होमची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गूगलने सांगितले होते की, 3 डिसेंबरनंतर गूगल ज्यांनी त्यांचे स्टेटस अपलोड केले नाहीत किंवा लसीकरण केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात करेल. गूगलनं म्हटलं की, ज्या कर्मचाऱ्यांनी 18 जानेवारीपर्यंत लसीकरण नियमांचे पालन केले नाही, त्यांना 30 दिवसांसाठी 'पेड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लीव्ह'वर ठेवण्यात येईल. यानंतर 6 महिन्यांसाठी 'अनपेड पर्सनल लीव्ह' आणि नंतर सेवा समाप्त केली जाईल. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, Google ने सीएनबीसीच्या अहवालावर थेट भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले, 'आम्ही आमच्या लसीकरण करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वकाही करण्यास वचनबद्ध आहोत."

आता सुरू राहील वर्क फ्रॉम होम

गूगलने वर्क फ्रॉम होम सुविधा संपवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता तो निर्णय पुढे ढकलला आहे. गूगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते, की नवीन वर्षात 10 जानेवारीपासून कर्मचारी आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करेल, त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता रिटर्न टू ऑफिस प्लॅन अमलात आणला जाणार नाही.. गूगलची जवळपास 60 देशांमध्ये 85 कार्यालये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT