ग्लोबल

अमेरिकेसह ३० देशांचे रशियन विमानांना मार्ग बंद; बायडेन म्हणाले, पुतीन 'हुकूमशहा'

सकाळ डिजिटल टीम

Joe Biden speaks on Russia Ukraine War : युक्रेन-रशियामध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या दोन्ही देशांमध्ये काल शांतता चर्चा पार पडली. पण, युद्धावर पूर्णविराम लागत नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चिता व्यक्त केली. यावेळी त्यांनी रशियाला खडसावत युक्रेनच्या पाठिशी असल्याचं सांगितलं.

अमेरिका आणि आमचे सहयोगी देश नाटो क्षेत्राच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पुतीन यांना युद्धभूमीवर फायदा होऊ शकतो. परंतु त्यांना याची दीर्घकाळासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. स्टेट ऑफ द युनियनला संबोधित करताना त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. (US will join allies in closing off American airspace to all Russian flights)

अमेरिकेवर विश्वास ठेवण्यासाठी बायडेन यांनी युक्रेनियन नागरिकांचे आभार मानले. त्यांनी दाखवलेल्या शौर्याची प्रशंसा केली. अमेरिकेसह NATO देशांनीही रशियातून येणाऱ्या सर्व विमानांसाठी हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेनंतर त्यांना स्टेट ऑफ द युनियनच्या सभेत सर्वांनी स्टॅडिंग ओव्हेशन दिलं. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं. कोणत्याही परिस्थितीत आम्ही युक्रेनच्या पाठिशी आहोत, असं आश्वासन देत त्यांनी पुतीन यांना हुकुमशाहा असल्याचं संबोधलं.

काय म्हणाले बायडेन?

  • रशियाचा युरोपला तोडण्याचा डाव

  • रशियानं एवढा कडवा प्रतिकार अपेक्षित केलाच नसेल

  • पुतीन यांना जगाने एकट पाडलंय..याआधी कधीही असं झालं नव्हतं.

  • आम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले आहेत..रशियाचं कंबरडं मोडलंय

  • आम्ही रशियाच्या बँका आणि त्यांच्यावरील टेक्नॉलॉजिकल निर्बंध लादत आहोत

  • युरोपातील पुतीन यांचे प्रायव्हेज जेट्स, लग्झरी अपार्टमेंट्स सील करणार

  • नाटो देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका सैन्य पाठवेल

  • १ बिलियन अमेरिकन डॉलर्स युक्रेनला मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT