biden harris
biden harris 
ग्लोबल

अमेरिका ‘युनायटेड’ : ज्यो बायडेन - कमला हॅरिस पर्वाला प्रारंभ

सकाळ ऑनलाईन टीम

US 46th President Oath Ceremony : जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यू.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि ‘अमेरिकेचा आत्मा’ परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उपाध्यक्षपद स्वीकारत अमेरिकेच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात केली. दोन आठवड्यांपूर्वीच हिंसाचाराचा साक्षीदार झालेल्या ‘कॅपिटॉल’मध्येच बायडेन यांच्या शपथविधीमुळे शांततेच्या नव्या पर्वाची आशा अमेरिकी नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी दिमाखदार पद्धतीने झाला. हॅरिस या पहिल्या महाला उपाध्यक्ष झाल्या आहेत. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ अमेरिकी काँग्रेसच्याच सदस्यांना हजर राहण्याची परवानगी होती. दरवेळी उपस्थित राहणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व व्यासपीठासमोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या अमेरिकेच्या दोन लाख राष्ट्रध्वजांनी केले.

खुल्या मनाने पराभव मान्य करण्यास अखेरपर्यंत नकार दिलेले डोनाल्ड ट्रम्प हे शपथविधीच्या काही तास आधीच ‘व्हाइट हाऊस’मधून फ्लोरिडाला रवाना झाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. बराक ओबामा, जॉर्ज डब्लू बुश आणि बिल क्लिंटन हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष मात्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्सही शपथविधीला हजर होते.

पस्तीस शब्दांत शपथ घेतली
अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ३५ शब्दांत शपथ घेतली. कॅपिटॉल हिल येथे आयोजित सोहळ्यात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता डेमोक्रॅट जोसेफ आर बायडेन ज्युनिअर म्हणजेच ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.

कोणी दिली शपथ
अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन जी रॉबर्ट ज्युनिअर यांनी कॅपिटॉल हिल्सच्या पश्‍चिम भागात बायडेन यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यानंतर अध्यक्ष बायडेन यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी त्यांनी अमेरिकी मतदारांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी अमेरिकी सैनिकांकडून मानवंदना स्वीकारली.

कॅपिटॉल हिलवरुन व्हाइट हाऊस
शपथविधीनंतर अध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे ‘प्रेसिडेंट एक्सॉर्ट’ कॅपिटॉल हिलवरून व्हाइट हाऊसकडे मार्गस्थ झाले. एरव्ही नव्या अध्यक्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तीन लाखाहून अधिक नागरिक उभे असतात. परंतु यंदा कोरोनामुळे रस्त्यावर अमेरिकी ध्वज लावण्यात आले.

विशेष पाहुणे कोण होते
मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. त्याऐवजी उपाध्यक्ष माइक पेन्स उपस्थित होते. याशिवाय माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा यांची विशेष उपस्थिती होती.

उपराष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदाच एक महिला विराजमान होणार आहे. 

पस्तीस शब्दांत शपथ
अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन हे ३५ शब्दांत शपथ घेतील. कॅपिटॉल हिल येथे आयोजित सोहळ्यात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता डेमोक्रॅट जोसेफ आर बायडेन ज्युनिअर म्हणजेच ज्यो बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

आजपासून आपण नव्या दिवसाला सुरुवात करतोय : बायडेन यांचे ट्विट

युवा सिनेटर ते अध्यक्ष
अत्यंत तरुण वयात आपल्या राजकीय किरकिर्दीची सुरुवात करणारे ज्यो बायडेन (वय ७८) हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. तब्बल पाच दशकांच्या राजकीय प्रवासानंतर ते सर्वोच्च स्थानी येऊन पोहोचले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बायडेन यांनी १९८८ आणि २००८ अशा दोन वेळेस अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले होते. यंदा मात्र त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत हे पद मिळविले. आपल्या राजकीय प्रवासात बायडेन यांनी सहा वेळा सिनेटर म्हणून काम पाहिले होते. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात (२००८ ते २०१६) त्यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. 

सर्वार्थाने पहिल्या...
अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी इतिहास घडविला आहे. या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकी वंशाच्या व्यक्ती आणि पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या हॅरिस यांनी अनेक टप्पे पार करत कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरलपदापर्यंत मजल मारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT