america joe biden
america joe biden 
ग्लोबल

'आमच्या कामात अडथळा आणू नका', बायडेन यांचा तालिबानला इशारा

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की,'अमेरिकन सैन्यावर हल्ला किंवा काबूल विमानतळावरून लोकांना बाहेर काढण्याच्या आमच्या कामात अडथळा आणलात तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. तसंच आमचं प्रशासन दहशतवाद विरोधी मोहिमेवर आहे. त्यांच्या कामात तिथले सहकारीसुद्धा आहेत.' अमेरिका सध्या अफगाण नागरिकांना देशात प्रवेश देण्याची प्रक्रिया वेगानं राबवत आहे.

'आतापर्यंत आम्ही 18 हजार नागरिकांना जुलैपासून स्थलांतरीत केलं आहे. तर काबूलमधून 14 तारखेपासून अंदाजे 13 हजार लोकांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे', अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. बायडेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की,'आम्ही तालिबानला हे स्पष्ट सांगितलं आहे, कोणताही हल्ला आमच्या सैनिकांवर किंवा विमानतळावर सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये अडथळा आणल्यास लगेच आणि जशास तसे उत्तर दिले जाईल.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बायडेन यांनी धीर दिला असून आम्ही तुम्हाला घरी पोहोचवू असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच इतिहासातील सर्वात कठीण काळ असून मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणीही हे चित्र पाहू शकेल अशा शब्दात बायडेन यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी नाटो सहकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी अफगाणिस्तानबाबत महत्त्वाची चर्चा झाली.' अँथनी ब्लिंकन यांनी अमेरिका किंवा त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद्यांचा तळ म्हणून होणं रोखण्यासाठीच्या रणनितीवर चर्चा केली. यासाठी गेल्या काही दिवसात ब्रिटन, जर्मनी, फ्रान्सशी चर्चा केली होती. तसंच पुन्हा जी 7 आयोजित करणार असल्याचंही बायडेन म्हणाले.

जगातील अग्रेसर अशा लोकशाही देशांच्या जी 7 ची एक बैठक पुढच्या आठव़ड्याच घ्यायला हवी आणि आम्ही ती भरवू. अमेरिकेच्या सैनिकांना अफगाणिस्तानातून मागे बोलावले कारण अमेरिकेनं अल कायदाला संपवून त्यांची मोहिम फत्ते केली आहे. अल कायदा संपल्यानंतर आम्हाला तिथे काही रस नाही. ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी आणि अफगाणिस्तानमध्ये अल कायदापासून सुटका करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो असेही बायडेन यांनी सांगितले.

अमेरिकेने गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून अफगाणिस्तानमधून सैनिक मागे घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेने सप्टेंबरपर्यंत सर्व सैन्य परत येईल असं म्हटलं आहे. गेल्या चार महिन्यात तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. अद्याप तालिबानने त्यांचा प्रमुख कोण असणार याची घोषणा केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

Pig Kidney Transplant: शरीरात डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; दोन महिन्यांपूर्वी झाली होती ऐतिहासिक शस्त्रक्रिया

Latest Marathi News Live Update : देशाची जनताच मोदींची वारस.. तुम्हीच माझा परिवार - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT