Joe Biden with Vladimir Putin 
ग्लोबल

तत्काळ युक्रेन सोडा; जो बायडेन यांचे अमेरिकन लोकांना आदेश, युद्धाचेही संकेत

सकाळ डिजिटल टीम

अमेरिका आणि रशियातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे. युक्रेनच्या सीमांवर लष्कर तैनात केल्यानंतर दोन्ही महासत्ता माघार घ्यायला तयार नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना युक्रेनमधून ताबडतोब निघून जाण्याचे आवाहन केलं आहे.

अमेरिका आणि रशियन सैन्याने जमिनीवर एकमेकांना गुंतवून ठेवल्यास येणाऱ्या काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं त्यांनी म्हटलंय. मॉस्कोसोबत संभाव्य संघर्षाबद्दल त्यांनी संकेत दिले आहेत. (Joe Biden warns US citizens to leave Ukraine)

'अमेरिकन नागरिकांनी आता निघून जावं, आणि युक्रेन सोडावं', अशी माहिती बायडेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक असलेल्या रशियासोबत व्यवहार करत आहोत. यंदा परिस्थिती खूप वेगळी आहे आणि गोष्टी लवकर वेडी वाकडी वळणं घेऊ शकतात,' असं बायडेन म्हणाले.

या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील परिस्थिती चिघळल्याचा अंदाज येतो. येणाऱ्य़ा काळात संघर्ष तीव्र झाल्यास युक्रेनमधील अमेरिकी नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्यांनी देश सोडून जावं, असं आवाहन करत असल्याचं बायडेन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT