China Drug Fentanyl eSakal
ग्लोबल

China Drug Fentanyl : चीनच्या ड्रगमुळे अमेरिकेत 70 हजार नागरिकांचा बळी; अखेर बायडेन-जिनपिंग करणार मोठी कारवाई

China town Drug Deaths : यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे 619 जणांचा बळी गेला आहे.

Sudesh

US Fentanyl Drug Death : अमेरिकेतील ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे फेंटानिल नावाच्या ड्रगचे उत्पादन बंद करण्याची मागणी अमेरिकेने केली होती. यानंतर आता चीनने ही मागणी मान्य करत याचे उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे. या ड्रगमुळे अमेरिकेत गेल्या वर्षात तब्बल 70 हजार जणांचा बळी गेला होता.

फेंटानिल हे एक सिंथेटिक ड्रग आहे. यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे 619 जणांचा बळी गेला आहे. या ड्रगला चायना टाऊन, चायना व्हाईट अशा नावांनी देखील ओळखलं जातं. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या APCE परिषदेमध्ये बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली होती.

औषध म्हणून सुरुवात

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिल हे एक सिंथेटिक ओपिऑईड आहे. 1998 साली अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याचा पेनकिलर म्हणून वापर सुरू केला होता. यासोबतच कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. फेंटानिल हे मॉर्फिनपेक्षा 100 पटींनी तर हेरॉइनपेक्षा 50 पटींनी अधिक प्रभावी आहे. (Global News)

ड्रग म्हणून वापर

याच फेंटानिलचा वापर दुसरीकडे ड्रग म्हणूनही केला जातो आहे. याच्या अतिसेवनाने अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातो. फेंटानिल हे लिक्विड, पावडर आणि गोळ्यांच्या स्वरुपात देखील उपलब्ध होतं. आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रुपातही हे उपलब्ध होतं. त्यामुळेच याची तस्करी आणि वापर हा चिंतेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT