India-Canada Dispute eSakal
ग्लोबल

India-Canada Dispute : भारतावर आरोप करणं भोवलं; जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता घटली! निवडणुकीत बसणार फटका

Justin Trudeau Popularity : जस्टिन ट्रुडो हे कॅनडातील लिबरल पार्टीचं प्रतिनिधित्व करतात.

Sudesh

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. जस्टिन ट्रुडोंना या वादाचा मोठा फटका बसला आहे.

कॅनडामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की कॅनडामधील लोकांनी पंतप्रधान पदासाठी ट्रुडो यांना नाकारलं आहे. Ipsos या मार्केट रिसर्च करणाऱ्या कंपनीने हे सर्वेक्षण केलं आहे.

ट्रुडोंना कमी मतं

या सर्वेक्षणात असं म्हटलं आहे, की आज जर कॅनडामध्ये निवडणुका झाल्या, तर 40 टक्के नागरिक विरोधी पक्षनेते Pierre Poilievre यांना मत देतील. तसंच, ट्रुडो यांना केवळ 30 टक्के मतं मिळतील. कॅनडाच्या ग्लोबल न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जस्टिन ट्रुडो हे कॅनडातील लिबरल पार्टीचं प्रतिनिधित्व करतात. 2015 साली हा पक्ष बहुमताने सत्तेत आला होता. तर, पिएरे यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला ट्रुडो यांची लोकप्रियता भरपूर कमी झाली आहे.

2025 साली निवडणूक

सर्वेक्षणात मिळालेली ही माहिती म्हणजे ट्रुडो यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. जुलैमध्ये झालेल्या दुसऱ्या एका सर्व्हेमध्ये ट्रुडो यांना 50 टक्के मतं मिळाली होती. आता हे प्रमाण 30 टक्क्यांवरच आलं आहे. 2025 साली कॅनडामध्ये पुढील निवडणूक होणार आहे. सध्याचं लोकप्रियतेचं प्रमाण पाहता, कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळून कॅनडामध्ये नवं सरकार येण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT