joe biden esakal
ग्लोबल

'धार्मिक कपड्यांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटकनं ठरवू नये'

सकाळ डिजिटल टीम

'धार्मिक कपड्यांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटकनं ठरवू नये.'

कर्नाटकातील (Karnataka Hijab Controversy) हिजाब वादाचे पडसाद आता परदेशातही उमटायला सुरुवात झालीय. मुस्लीम विद्यार्थ्यांनी भारतात हिजाब घालण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं (America) कर्नाटकवर जोरदार टीका केलीय. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवरून निर्माण झालेल्या वादावर अमेरिकेनं आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. अमेरिकेनं म्हटलंय, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालणं हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. धार्मिक कपड्यांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटकनं ठरवू नये, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

यूएस सरकारमधील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याचे राजदूत रशाद हुसैन (Rashad Hussain) म्हणाले, धार्मिक स्वातंत्र्यामध्ये लोकांना त्यांचे धार्मिक कपडे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. भारतातील कर्नाटक राज्यानं (State of Karnataka) धार्मिक पोशाखांना परवानगी आहे की, नाही हे ठरवू नये. शाळांमधील हिजाबवरील बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असून महिला, मुलींकडं सरकार दुर्लक्ष करत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

हुसैन हे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी जे. ब्लिंकन यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात. जगभरात धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन, छळ आणि भेदभाव यासारख्या घटनांवर ते भाष्य करत असतात. याआधी पाकिस्ताननंही हिजाबच्या वादावर आपलं मत नोंदवलंय. इम्रान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी भारत आणि मोदी सरकारविरोधात जहरी टीका केलीय. मोदींच्या भारतात जे घडतंय, ते भयावह आहे. अस्थिर नेतृत्वाखाली भारतीय समाज अधोगतीकडं जात आहे. तसेच इतर कोणत्याही पोशाखाप्रमाणं हिजाब घालणं ही देखील वैयक्तिक पसंतीची बाब आहे, असं ते म्हणाले. नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) म्हणाली, मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्यापासून रोखणं चुकीचं आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणं थांबवावं, असं तिनं मत मांडलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT