Kazakhstan Sakal
ग्लोबल

दिसताक्षणी बंडखोरांना गोळ्या घालण्याचे कझाकीस्तान सरकारचे आदेश

कझाकीस्तानमध्ये (Kazakhstan) जनआंदोलन तीव्र झाल्यानंतर सरकारही आक्रमक झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नूर सुलतान : कझाकीस्तानमध्ये (Kazakhstan) जनआंदोलन तीव्र झाल्यानंतर सरकारही आक्रमक झाले आहे. हिंसाचाराला दहशतवादी आणि बंडखोर कारणीभूत असून अशा लोकांना दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले असल्याचे देशाचे अध्यक्ष कासिम जोरमात तोकायेव्ह यांनी सांगितले. (Global News in Marathi)

तोकायेव्ह यांनी आज दूरचित्रवाणीवरून जनतेशी संवाद साधत बंडखोरांना इशारा दिला. आंदोलकांशी चर्चा करण्यास साफ नकार दिला आहे. ‘खूनी आणि गुंडांबरोबर काय चर्चा करणार?,’ असा सवाल त्यांनी केला. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संघर्षात आतापर्यंत २६ आंदोलकांचा मृत्यू झाला असून १८ पोलिसांनाही जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात हजार जणांना ताब्यात घेतले आहे.

शांती सैन्याची मदत

इंधनाचे दर दुपटीने वाढल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. हिंसक बनलेल्या या आंदोलनात आंदोलकांनी सरकारी इमारती आणि अधिकाऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. सरकारने रशियाच्या नेतृत्वाखालील सामूहिक सुरक्षा करार संघटनेकडे लष्करी मदतीची मागणी केली आहे. हे सैन्य तैनात होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हे सैन्य केवळ सरकारी इमारतींचेच संरक्षण करणार असल्याचे कझाकीस्तानच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT