ग्लोबल

'दर्यादिल' केनियाची थट्टा करण्याआधी एकदा हे वाचा...

विनायक होगाडे

नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. या महासंकटाच्या काळात देशाला मदतीचा ओघ मोठ्या संख्येने सुरु आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्स अशा अनेक देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलींडर्स, मेडीसीन्स आणि निदान करणारी उपकरणांचा समावेश आहे. अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यातच आता आणखी एका देशाची भर पडली आहे. पूर्व अफ्रिकन देश केनिया या देशाने देखील भारताला कोरोना संकटाच्या काळात मदत म्हणून 12 टन खाद्य उत्पादने पाठवली आहेत. गेल्या 28 मेला ही मदत भारतात पोहोचली आहे. मात्र, केनियाने केलेल्या या मदतीची थट्टा उडवण्यात येत असल्याचं दिसून येत आहे, जी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सोशल मीडियात यासंदर्भातील अनेक खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट्स तसेच ट्विट्स दिसून आल्या. हे करताना केन्याचा उल्लेख 'गरीब देश', 'कंगाल देश' असाही केला गेला. काहींनी तर अशा देशाकडून मदत घेण्याची वेळ मोदी सरकारने देशावर आणली आहे, असंही म्हटल्याचं दिसून आलं. भारतावरील कोरोना संकटामागे दोष कुणाचा हे आपल्याला नंतर चर्चा करता येईलच मात्र, या सगळ्यात मोठ्या मनाने मदत केलेल्या केनियाचा उपमर्द कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. (Kenyas helped 12 tonne food relief for India14 cows donated by Kenyan Masai tribes people to US)

एका वक्तव्यात केनियाने शुक्रवारी म्हटलंय की, केनियाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीला 12 टन चहा, कॉफी आणि शेंगदाणे दिले आहेत, ज्याचं उत्पादन स्थानिक पातळीवर केलं जातं. या सगळ्या मदतीतून आलेल्या खाद्य उत्पादनांना महाराष्ट्रात वाटप केलं जाणार आहे. भारतात केनियाचे उच्च आयुक्त विली बेट यांनी म्हटलंय की, केनिया सरकार खाद्य पदार्थ दान देऊन कोरोना महासंकटाच्या काळात भारत सरकार आणि भारतीय लोकांसोबत उभं राहू इच्छितो. ही खाण्याचे साहित्या देण्यासाठी नवी दिल्लीहून मुंबईला आलेल्या ब्रेटने म्हटलंय की, ही मदत फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जाणार आहे, जे लोक जीव वाचवण्यासाठी तासनतास काम करत आहेत.

कोविडविरोधातील लढ्यासाठी बारा टन कॉफी व चहा महाराष्ट्राला देण्यासाठी आलेले केनियाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त विली बेट (डावीकडून तिसरे) व अन्य मान्यवर

अमेरिकेला 14 गायींची मदत करणारा 'दर्यादिल' केनिया

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला 9/11 चा हल्ला भीषण होता. या हल्ल्याने अमेरिकेसहित संपूर्ण जगाला हादरा बसला होता. 2001 साली झालेल्या या हल्ल्यात सुमारे तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी अमेरिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक देशांनी अमेरिकेला मदत केली होती. यातीलच एक देश होता तो म्हणजे हा दर्यादिल केनिया. अमेरिकेवरील या हल्ल्याची खूप महिन्यांनी केनियातील मसाई या आदिवासी समूहात पोहोचली. तेंव्हा तिथल्या मसाई आदीवाशांनी अमेरिकेला मदत करण्याचे ठरवलं. त्यावेळी या मसाई लोकांनी केनियातील अमेरिकन दुतावासातील डेप्यूटी हेड विल्यम ब्रॅंगिक यांना आपल्याकडून मदत देऊ केली. ती मदत होती 14 गायी. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल पण हे खरंय. मसाई आदिवासी गुरेढोरे पवित्र मानतात आणि ते सहसा लग्न किंवा घरी परतताना भेट देतात.

आपल्या गावाजवळील जवळच्या गावात राहणाऱ्या आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा त्यांनी मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली तेंव्हा ते हळहळले. आणि त्यांनी त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवले.

विल्यम ब्रॅंगिक देखील मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा खडतर वाटेने प्रवास करत पोहोचले. गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत 14 गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाईच्या एका ज्येष्ठ व्यक्तीने गाईचा दोर त्यांच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केले. त्यावर लिहिले होते -

"या दु:खाच्या प्रसंगी अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".

पण प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधनांचा! त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गायी विकून त्यातून येणाऱ्या रकमेतून एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला. जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे? त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या, मात्र आभूषणे ठेवू नयेत. मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT