Nigeria  esakal
ग्लोबल

Nigeria : नायजेरियातल्या शाळेतून ३०० विद्यार्थ्यांचे अपहरण; दोन दिवसांनंतरही मुलांचा शोध लागला नाही

कुरिगा : सुमारे दहा वर्षांपूर्वी अपहरणांच्या घटनांमुळे गाजलेल्या नायजेरियामध्ये पुन्हा एकदा अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक महिन्यांपासून अंतर्गत संघर्षाचा सामना करत असलेल्या या देशातील वायव्य भागातील कुरिगा येथील एका शाळेतून एका सशस्त्र टोळीने शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले असून दोन दिवसांनंतरही या विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा समजलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

कुरिगा : सुमारे दहा वर्षांपूर्वी अपहरणांच्या घटनांमुळे गाजलेल्या नायजेरियामध्ये पुन्हा एकदा अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक महिन्यांपासून अंतर्गत संघर्षाचा सामना करत असलेल्या या देशातील वायव्य भागातील कुरिगा येथील एका शाळेतून एका सशस्त्र टोळीने शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले असून दोन दिवसांनंतरही या विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा समजलेला नाही.

नायजेरिया हा आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात मागील दहा दिवसांत अपहरणाच्या दोन घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात सोकोतो प्रांतातून बंदुकधाऱ्यांनी १५ विद्यार्थ्यांचे अपहरण केले असून त्यानंतर दोनच दिवसांत बोर्नो या प्रांतात सुमारे २०० जणांचे अपहरण झाले आहे.

याच बोर्नो प्रांतात २०१४ मध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांनी दोनशेहून अधिक मुलींचे शाळेतून अपहरण केले होते. दोन दिवसांपूर्वी कुरिगा येथील शाळेमध्ये काही बंदुकधारी घुसले आणि त्यांनी सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचे अपहरण केले. या अपहरणांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, वसाहतींच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भटक्या टोळ्यांनीच हे अपहरण केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

ज्या शाळेतून अपहरण झाले ती शाळा जंगलाच्या लगतच आहे. हल्लेखोरांनी शाळेला वेढा घालत हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना घेऊन ते जंगलात गेले. अपहरण झालेल्या तीनशे विद्यार्थ्यांपैकी किमान शंभर विद्यार्थी बारा वर्षांच्या आतील आहेत. पोलिसांनी जंगलामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असली तरी दोन दिवसांनंतरही कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT