bombings disrupted news broadcast bombings disrupted news broadcast
ग्लोबल

किव्हमध्ये बाॅम्बच्या स्फोटांनी बातम्यांचे प्रसारण थांबले; व्हिडिओ रेकॉर्ड

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनची राजधानी किव्हमध्ये (Kiev) हल्ले केले आहेत. बुधवारी (ता. २) केलेल्या स्फोटांनी रात्री आकाश उजळून निघाले होते. अचानक झालेल्या स्फोटांच्या प्रकाशाने पत्रकाराला प्रसारण बंद करावे लागले. व्हिडिओमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली.

रशियाने (russia) युक्रेनवर हल्ला केल्याला एक आठवडा उलटला आहे. राजधानी किव्हसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर रशियाकडून गोळीबार झाला. सुमारे तीस लाख लोकसंख्येच्या शहरावर हल्ला होत आहे. येणाऱ्या दिवसात आणखी स्फोट आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी खेरसन हे प्रमुख बंदर शहर रशियन सैनिकांनी ताब्यात घेतले. आता ओडेसा हे तिसरे सर्वांत मोठे शहर पुढील लक्ष्य आहे.

अमेरिकेने पुष्टी केली आहे की ओडेसावर हल्ला होणार आहे. दरम्यान, युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खारकिव्ह शहरात जोरदार लढाई सुरू आहे. युक्रेनच्या (ukraine) प्रमुख शहरांमध्ये एअर सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने कालच भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत खारकिव्ह सोडण्यास सांगितले आहे. येथील धोका वाढतच चालला आहे.

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर संवाद साधला होता. आतापर्यंत दोन भारतीयांच्या या हल्ल्यात निष्पाप बळी गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT