Kim Jong-un statement stockpile of nuclear weapons will increase rapidly sakal
ग्लोबल

Kim Jong-un : अण्वस्त्र साठ्यात वेगाने वाढ करणार; किम जोंग उन

किम यांचा नवीन वर्षाचा संकल्प; अधिकाऱ्यांना दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

सोल : जगाशी फटकून राहणाऱ्या उत्तर कोरियाने गेल्या वर्षात सर्वधिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्यानंतर नव्या वर्षातही याच मार्गावर चालण्याचा निश्‍चय या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी केल्याचे त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून दिसून आले आहे.

देशाच्या अण्वस्त्र साठ्यात वेगाने वाढ करण्याचा आणि नवीन, अधिक शक्तीशाली आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा आदेश किम यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्र क्षमता वाढविण्याचा इशारा किम जोंग उन यांनी यापूर्वी वारंवार दिला आहे.

त्याच धोरणाला अनुसरून त्यांनी आज आपल्या अधिकाऱ्यांना नवीन क्षेपणास्त्र विकसीत करण्याचा आदेश दिला आहे. आपले सामर्थ्य वाढवून त्या बळावर बड्या देशांना वेठीस धरत निर्बंध कमी करण्याचा उत्तर कोरियाचा अंतस्थ हेतू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

किम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्यांनी, देशाची स्वायत्तता, सुरक्षा आणि हित जपण्यासाठी लष्करी ताकद वाढविण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी किम यांनी दक्षिण कोरिया आणि अमेरिका या त्यांच्या दोन प्रमुख शत्रू देशांवर जोरदार टीका केली.

अमेरिकेच्या मदतीने दक्षिण कोरियाने सीमेवर तणाव निर्माण केल्यानेच उत्तर कोरियाला सावध रहावे लागत आहे, असा दावा किम यांनी केला. दक्षिण कोरियाने अमेरिका आणि जपानच्या साह्याने उत्तर कोरियाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचाही आरोप किम यांनी केला.

उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ला करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली असल्यानेच त्याचा सामना करण्यासाठी आपण आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचे आदेश दिले आहेत, असे किम म्हणाले.

क्षेपणास्त्रविकास हाच स्थैर्याचा मार्ग

नव्या वर्षात उत्तर कोरियाची अण्वस्त्र क्षमता वाढविताना किम जोंग उन यांनी आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राबरोबरच लघु पल्ल्याची काही क्षेपणास्त्रे, लष्करी उपग्रह, पाण्यातून मारा करता येणारे अण्वस्त्र यांचा विकास करण्याचा संकल्प सोडला आहे.

याशिवाय, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. क्षेपणास्त्रे हाच युद्ध रोखण्याचा मार्ग असून त्याद्वारेच देशात स्थैर्य निर्माण होईल, असे किम यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT