king jong un 
ग्लोबल

किम जोंग उन यांची प्रकृती अद्याप गंभीर

पीटीआय

प्याँगयेंग (उत्तर कोरिया) - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (वय ३६) यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अमेरिकेतील वृत्तवाहिनेने दिल्यानंतर सर्व जगात खळबळ उडाली. किम हे कोमात गेल्याचेही सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या अमेरिकी अधिकाऱ्याचा हवाला देत ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनेने किम यांच्या आजारपणाचे वृत्त दिले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवर अमेरिका लक्ष ठेवून आहे, असे ‘सीएनएन’ने म्हटले आहे. मात्र ‘ व्हाईट हाउस’कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दक्षिण कोरियातील सोलमधील ‘ द डेली एनके’ या संकेतस्थळाने त्यांच्या स्रोतांकडून मिळालेली माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार किम यांच्यावर हेयांगसान येथील रुग्णालयात १२ एप्रिल रोजी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र ते त्यातून बरे झालेले नाहीत. मात्र उत्तर कोरियातील अनेक घडामोडी उघड होत नसल्याने या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. ही बातमी तर देशातील बलाढ्य प्रमुखाविषयी असल्याने त्याची सत्यता किम यांच्या निकटच्या व्यक्तींनाच माहीत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सतत धूम्रपान करणे, लठ्ठपणा आणि अति काम यामुळे किम यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याचे सांगितले जात आहे.

किम जोंग उन त्यांच्या आरोग्यावरून काही माध्यमांमध्ये ज्या अफवा पसरल्या आहेत, त्याविषयी आमच्याकडे खात्रीलायक माहिती नाही. तसेच उत्तर कोरियात कोणत्याही संशयास्पद घडामोडी आढळल्या नाहीत.
- कांग मिन्सोक, दक्षिण कोरिया सरकारचे प्रवक्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT