King Charles diagnosed with cancer will undergo treatment buckingham palace Marathi News rak94 
ग्लोबल

King Charles Cancer : किंग चार्ल्स यांना कॅन्सरच निदान; बॅकिंघम पॅलेसने दिली माहिती

King Charles Cancer News : ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

King Charles Cancer News : ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बकिंघम पॅलेस ने याबद्दलचे निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे.

बकिंघम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात माहिती देण्यात आळी आहे की किंग चार्ल्स तृतीय यांना कॅन्सरची लागण झाली आहे. प्रोटेस्ट ग्रंथीच्या चाचणीदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे समोर आले. मात्र कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे याबद्दल खुलासा करण्यात आली नाही. कॅन्सरचा प्रकार आणि तो शरीरातील कोण्यात भागात आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये.

या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार इलाजादरम्यान किंग चार्ल्स यांना या आजाराचे निगान झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी किंग चार्ल्स यांना कोणतेही सार्वजनिक कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते या उपचारांदरम्यान राजकीय कामकाज करत राहाणार आहेत.

किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकर लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच ते लवकरच पूर्ण ताकतीने परततील याची मला खात्री आहे, संपूर्ण देश त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असेल अशी पोस्ट सुनक यांनी सोशल मीडीयाव प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतिय ब्रिटनेच किंग बनले होते. मागील वर्षी मे मध्ये त्यांचा राज्यभिषेक झाला होता. यानंतर त्यांना किंग चार्ल्स तृतिय नावाने संबोधित केले जाते. त्यांचे वय ७३ वर्ष आहे.

चार्ल्स यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी बकिंघम पॅलेसमध्ये झाला होता, ते चार वर्षांचे असताना त्यांची आई महाराणी एलिझाबेथ या पदावर विराजमान झाल्या होत्या. १९६९ मध्ये २० वर्षांच्या असताना त्यांना महाराणीने कॅरफर्नन कॅसल मध्ये प्रिंस ऑफ वेल्स म्हणून नियुक्त केलं गेलं होतं.

चार्ल्स यांनी २९ जुलै १९८१ मध्ये लेडी डायना स्पेंसर यांच्य़ाशी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुलं प्रिंस विलियम आणि प्रिंस हॅरी आहेत. २८ ऑगस्ट १९९६ रोजी हे लग्न मोडलं. ९ एप्रिल २००५ मध्ये त्यांनी कॅमिला यांच्याशी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT