ग्लोबल

कोण आहेत ते चौघे? अंतराळवीर नसूनही पैशाच्या जोरावर झेपावले अंतराळात

सकाळ वृत्तसेवा

Space Civilian Mission: एलन मस्क यांची अमेरिकन एयरोस्पेस कंपनी ‘स्पेसएक्स’ने इतिहास रचला आहे. ‘इन्स्पिरेशन -४’ या मोहिमेअंतर्गत कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे 5 वाजून 32 मिनिटांनी यानाने उड्डान घेतलं. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे. फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यानाने चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली. चार जण तीन दिवस जवळपास 575 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत. जाणून घेऊयात त्या चार जणांबद्दल...

सहभागी सदस्यांचा परिचय

जेअर्ड इसॅकमॅन - मोहिमेचे नेतृत्व इसॅकमॅन यांच्या हातात. इ-कॉमर्स कंपनी ‘शिफ्ट४ पेमेंट्स’चे ते संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या १६व्या वर्षीच त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. आज ते अब्जाधीशांमध्ये गणले जातात. ते व्यावसायिक वैमानिक असून स्वतःच्या विमान प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अमेरिकी हवाई दलातील वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते.

हेली अर्केनोः पृथ्वीभोवताच्या कक्षेत पाठविली जाणारी व अवकाशात कृत्रिम अवयव घेऊन जाणारी हेली अर्केनो ( वय २९) ही पहिली युवा अमेरिकन ठरणार आहे.तिच्या आसनाला ‘होप’ हे मूल्य दिले. मोहिमेत ती वैद्यकीय व्यवस्थापकाच्या भूमिकेत असेल.

शॉन प्रॉक्टर - या मोहिमेसाठी इसॅकमॅन कंपनीने आयोजित केलेली ऑनलाइन विक्रीत जिंकली होती. तिच्या आसनाला ‘प्रॉस्पेरिटी’ असे नाव आहे. प्रॉक्टर (वय ५१) या एका महाविद्यालयात भूगर्भशास्त्र हा विषय शिकवितात. ‘नासा’च्या अनेक अवकाश मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे.

ख्रिस सेम्ब्रोस्क - सेम्ब्रोक (वय ४२) हे अमेरिकेचा हवाई दलात वैमानिक होते. इराकविरुद्धच्या युद्धात ते सहभागी झाले होते. सध्या सेम्ब्रोक ‘लॉकहिड मार्टिन’बरोबर काम करतात.

जाणून घ्या मोहिमेविषयी...

- मोहिमेला ‘इन्स्पिरेशन -४’ असे नाव

- अब्जाधीश जेअर्ड इसॅकमॅन (वय ३८) हे सर्व खर्च करणार

- इसॅकमॅन यांनी स्वतःचा पैसा पुरविला आहे. तसेच देणगीही गोळा केली

- अमेरिकेतील टेनसीमधील सेंट चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट

- मोहिमेतून २० कोटी डॉलर एवढा निधी जमविण्याचे इसॅकमॅन याचे स्वप्न

- यातील निम्मी रक्कम ते रुग्णालयाला देणार

- लोकांना प्रेरित करणे व कर्करोगाबद्दल जागृती करणे हाही एक हेतू

- मोहिमेतील सदस्य यापूर्वी कधीही अंतराळात गेलेले नाहीत

- प्रत्येक सदस्यांचे मूल्य निश्‍चित केले आहे. उदा. लिडरशीप, होप, इन्स्पिरेशन आणि प्रॉस्पेरिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT