Harish Salve_Lalit Modi 
ग्लोबल

Lalit Modi: हरिश साळवेंच्या लग्नात एन्जॉय करताना दिसला ललित मोदी! व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ

यामुळं विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचारमुक्त भारत धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल तथा प्रसिद्ध विधीज्ञ हरिश साळवे हे नुकतेच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. लंडनमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला हायप्रोफाईल लोकांनी हजेरी लावली होती.

यामध्ये नीता अंबानी, लक्ष्मी मित्तल आणि मॉडेल उज्ज्वला राऊत यांच्यासह आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदीनं देखील हजेरी लावली. मोदी सध्या आर्थिक घोटाळाप्रकरणी फरार आहे. पण तरीही तो भारतातील बड्या लोकांना भेटत असल्यानं त्याला नेमकं कोण वाचवतंय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (Lalit Modi was seen enjoying at Harish Salve wedding Controversy erupted after video came out)

ललित मोदी सध्या लंडनमध्ये वास्तव्याला आहे. सन २०१० मध्ये त्यानं भारत सोडला, कर चुकवेगिरी आणि आर्थिक घोटाळ्याचे त्याच्यावर आरोप आहेत. पण हाच घोटाळेबाज फरार ललित मोदी परदेशात भारतीय उद्योगपतींना भेटत असल्यानं विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतातील वरिष्ठ वकिलांपैकी एक असलेल्या हरिश साळवे यांची नुकतीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील 'एक देश, एक निवडणूक' समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळं सरकारशी जवळचे संबंध असलेल्या साळवे यांच्यासोबत फरार ललित मोदी दिसून आल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Marathi Tajya Batmya)

शिवसेनेचा हल्लाबोल

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं, "भाजपच्या सरकारी वकिलानं तिसर्‍यांदा लग्न केलं आणि नंतर मोदी सरकारच्यावतीनं एकसमान विवाह कायदे, बहुपत्नीत्व इत्यादींवर अतिशय सोयीस्करपणे विधानं केली.

परंतु निमंत्रित म्हणून भारतीय कायद्यातून पळून जाणाऱ्या एका फरार व्यक्तीनं त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावावी याची प्रत्येकाला चिंता वाटायला हवी. ललित मोदी सरकारच्या आवडत्या वकिलाचं लग्न साजरं करत आहे. नेमकं कोण कोणाला मदत करतंय? कोण कोणाचं रक्षण करतंय? हा प्रश्नच आता उरलेला नाही," असं ट्विट चतुर्वेदींनी केलं आहे.

काँग्रेसनं राहुल गांधींचा मुद्दा केला उपस्थित

तर काँग्रेस नेते प्रितेश शाह यांनी देखील हरिश साळवेंच्या लग्नात ललीत मोदीच्या उपस्थितीबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटलं, "राहुल गांधींनी नीरव मोदींचं नाव घेतल्यानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं. पण आता तर ललित मोदी चोर असून त्याला वाचवण्याचं काम हरिश साळवे करत आहेत" (Latest Marathi News)

आपचा PM मोदींवर हल्लाबोल

आम आदमी पार्टीनं देखील ललित मोदीच्या हजेरीवरुन थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या PM मोदींच्या चारित्र्यावर आणखी एक काळा डाग लागल्याचं आपनं म्हटलं आहे. कारण मोदींचे जवळचे सहकारी हरिश साळवे आपल्या लग्नाच्या पार्टीत देशाचे हजारो कोटी रुपये लुटणाऱ्या ललित मोदीसोबत मजा करत आहेत. त्यामुळं आता देश प्रश्न विचारत आहे की, PM मोदींशी ललित मोदीचा काय संबंध आहे?

ललित मोदीचा वाद काय?

ललित मोदी हा बीसीसीआयच्या आयपीएलचा संस्थापक अध्यक्ष आहे. सन २०१० मध्ये आयपीएलनंतर यामध्ये आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत बीसीसीआयनं त्याची हाकालपट्टी केली होती. कारवाईच्या भीतीनं नंतर मोदी देशातून फरार झाला. त्याच्यावर ७५३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. सन २०१० पासून ललित मोदी लंडनमध्ये राहत आहे. तर भारतात ईडीकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT