Leaf Sakal
ग्लोबल

जगातील सर्वांत मोठं झाडाचं पान; Guinness World Record मध्ये नोंद

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. पण सध्या एका झाडाच्या पानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पानाची जगातील सर्वांत मोठं झाडाचं पान म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही पोस्ट करण्यात आली असून सध्या इंस्टाग्रामवरील ही पोस्ट चर्चेत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले पान हे जगातील सर्वांत मोठे अविभाजीत पान आहे. व्हिक्टोरिया बोलिव्हियाना ही सर्वात मोठी वॉटरलीली प्रजाती म्हणून ओळखली जाते, ज्याचे पानं 2.8 मीटर (9 फूट 2 इंच) व्यासापेक्षा जास्त वाढतात. तर याच झाडाच्या पानाची नोंद करण्यात आली असून सदर पानाचा व्यास 3.2 मीटर (10 फूट 6 इंच) होता.

दरम्यान, जर वरचा भाग सपाट असेल तर हे पान 3.37 मीटर (11 फूट) पर्यंत वाढते. त्याचे अंदाजे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 7.55 m2 (81.3 चौरस फूट) म्हणजे दोन मोठ्या आकाराच्या पलंगाएवढे आहे. सदर वनस्पती ही उत्तर-पूर्व बोलिव्हियामधील एल बेनी विभागातील लॅनोस डी मोक्सोस उष्णकटिबंधीय सवाना येथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT