lebanon
lebanon 
ग्लोबल

VIDEO - शक्तीशाली स्फोटांनी बैरूत हादरलं; भीषण दृश्ये आली समोर

सकाळ वृत्तसेवा

बैरूत - लेबनॉनची राजधानी बैरूत भीषण स्फोटांमुळे हादरलं आहे. या स्फोटांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची भीषण दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र स्फोटाची तिव्रता इतकी जबरदस्त होती की बैरूतला मोठा हादरा बसला आहे. शहरामध्ये दोन स्फोट झाले असल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

बैरुतमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये 15 मिनिटांचं अतंर होतं. स्फोटांचा आवाज आणि हादरा इतका भयंकर होता की घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटावेळी झालेल्या आवाजामुळे शहर हादरलं असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

लेबनॉनमधील माध्यमांनी स्फोटानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोक पडलेले दिसत आहेत. स्फोटाचे कारण मात्र स्पष्ट झालं नाही. बेरुतमधील पोर्ट भागात हा स्फोट झाला असून शहराला याचे धक्के बसले आहेत. काही भागांमधील वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.

स्फोट झाल्यानंतर धुराचे मोठे लोट हवेत पसरले आहेत. दरम्यान, भारतीय दुतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. बैरुतमध्ये असलेल्या भारतीयांनी शांत राहावं आणि घाबरू नये. मदत हवी असल्यास फोन करण्याचं आवाहन भारतीय दुतावासाने केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT