ऑस्ट्रेलियात गांजास कायदेशीर मान्यता 
ग्लोबल

ऑस्ट्रेलियात गांजास कायदेशीर मान्यता

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन विधिमंडळांने देशाची राजधानी कॅनबेरा आणि आसपासच्या प्रदेशात वैयक्तिक गांजा वापरास कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे गांजावरील निर्बंध शिथिल करणारे कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियातील पहिलेच शहर ठरले आहे. 

ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी (एसीटी) विधानसभेत बुधवारी (ता. २५) राजधानी कॅनबेरा क्षेत्रातील खासदारांकडून याबाबत एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाअंतर्गत ऑस्ट्रेलियातील सहा राज्यांसह, दोन मुख्य प्रातांमध्ये वैयक्तिक गांजा वापरास परवानगी देण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०२० पासून हा नवीन कायदा अंमलात येणार आहे.

मात्र, यासाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रतिव्यक्ती ५० ग्रॅम गांजा बाळगण्यास परवानगी देण्यात आली असून, गांजाचा वापर करणाऱ्याचे वय हे १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रति कुटुंब केवळ ४ गांजाच्या रोपांची लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संघराज्यीय कायद्यांशी परस्परविरोधी
ऑस्ट्रेलियाच्या संघराज्यीय कायद्यानुसार गांजा हा एक प्रतिबंधित पदार्थ आहे. त्यामुळे नवा कायदा हा ऑस्ट्रेलियातील संसद निर्मित राष्ट्रीय औषध कायद्यांशी परस्परविरोधी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये देखील गांजाच्या वैयक्तिक वापरास कायदेशीर मान्यता देण्याबाबत जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT