शवविच्छेदन शवविच्छेदन
ग्लोबल

मृतदेहाचे लाइव्ह शवविच्छेदन; नागरिकांनी काढले तिकीट

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : कुणाचा अकाली किंवा अपघातात मृत्यू झाल्यास डॉक्टर्स कुटुंबीयांचे समुपदेशन करून अवयव दान करण्यास सांगतात. यामुळे अन्य लोकांना जीवन जगता येईल, हा त्यामागचा उद्देश असतो. दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचा यातून प्रयत्न केला जातो. तसेच अनेकजण मृतदेह वैज्ञानिक प्रयोगांसाठी किंवा अभ्यासासाठी दान करतात. मात्र, यातून काही लोक व्यवहार करतात. असाच काहीसा प्रकार वॉशिंग्टनमध्ये घडला आहे.

९८ वर्षीय डेव्हिड सॉंडर्स यांचा मागच्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. मृताच्या पत्नीने पतीचा मृतदेह वैज्ञानिक प्रयोगांसाठी दान केला होता. परंतु, डाउनटाउन पोर्टलँड हॉटेलमध्ये पैसे देणाऱ्या प्रेक्षकांसमोर मृतदेह तपासणीसाठी ठेवण्यात आला होता. पोर्टलँड मॅरियट डाउनटाउन वॉटरफ्रंट येथील बैठकीच्या खोलीत डेव्हिड यांचा मृतदेह ७० लोकांसमोर ठेवण्यात आला होता.

लोकांनी त्याच्या तिकिटासाठी $५०० पर्यंत पैसे दिले. लोक मृतदेहाचे तुकडे पाहण्यासाठी तिकीट खरेदी करीत होते. तक्रारीनंतर अधिकारी प्रकरणाचा तपास करीत आहे. पोर्टलँड पोलिसांचे म्हणणे आहे की शवविच्छेदनादरम्यान कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे तपासात दिसून आले आहे. नागरी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे ते म्हणाले. मीडिया कंपनी डेथ सायन्सने मेड एड लॅबमधून सॉंडर्सचा मृतदेह विकत घेतल्याची माहिती आहे. कंपनी एका कार्यक्रमात मृतदेहाचा वापर करणार होती. डेथ सायन्सचे संस्थापक जेरेमी सिल्बर्टो यांनी निवेदनात सांगितले, त्यांनी मेड एड लॅबमधून सॉन्डर्सचा मृतदेह खरेदी केला आहे.

दिशाभूल केल्याचा आरोप

पतीचा मृतदेह मेड एड लॅब्सला दान केले तेव्हा लास वेगासस्थित कंपनीने शरीराचा उपयोग संशोधनासाठी करण्यात येईल असे सांगितले होते. तसेच अंत्यसंस्कारानंतर अवशेष परत देण्यात येईल असेही सांगितले होते. हॉटेलमध्ये प्रेक्षकांसमोर पतीच्या मृतदेहाची चाचणी केली जाईल हे तिला सांगितले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT