Liz Truss becomes new British Prime Minister defeats rival Rishi Sunak  esakal
ग्लोबल

Liz Truss : ऋषी सूनक यांना मागे टाकत लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव लिझ ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत, पदच्युत बोरिस जॉन्सन यांच्यानंतर त्यांनी प्रतिस्पर्धी भारतीय वंशाचे ऋषी सुनकचा यांचा पराभव केला आहे.

लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला. दरम्यान लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारमधील अनेक घोटाळे आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली आणि नवीन पंतप्रधान पदासाठी जुलैमध्ये निवडणूक सुरू झाली. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेली चढाओढ आज अखेर संपली असून ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT