Lockdown 
ग्लोबल

फ्रान्समध्ये पॅरिससह १६ शहरात लॉकडाउन

पीटीआय

लंडन - फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने राजधानी पॅरिसमध्ये महिनाभराचा लॉकडाउन लागू केला आहे. पॅरिससह देशातील अन्य १५ शहरातही शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू केला गेला आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्सच्या यांनी नव्या लॉकडाउनचे नियम हे पूर्वीइतके कडक नसतील, असे स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासात ३५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अनेक राज्यात वेगवेगळा स्ट्रेन पाहावयास मिळत असून ती तिसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे. आयसीयू मध्ये कमी वयाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. देशातील १६ प्रांतात संसर्गाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आवश्‍यक साधनांसह काही व्यवसाय आणि सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली जात आहे. बालवाडी, शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. यादरम्यान नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात, तसेच मैदानावर खेळूही शकतात. मात्र त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे.घराच्या दहा किलोमीटर परिसरातच फिरण्याची मुभा असेल.

दुसरीकडे युरोपियन मेडिसीन एजन्सी (इएमए) यांनी क्लिनचिट दिल्यानंतर युरोपिय देशांत लवकरच ॲस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड, जर्मनी, इटली, फ्रान्स, लॅटव्हिया, लिथुआनिया, सायप्रससह अनेक देशात या लशीची मोहीम सुरू होत आहे. आयर्लंड आणि स्वीडनमध्ये आढावा घेतल्यानंतरच लसीकरण सुरू होणार आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : मी उद्या मुंबईकडे जाणार : मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT