china sakal media
ग्लोबल

चीन जगाच्या जीवावरच उठलंय? अंतराळातून ओढावणार संकट

सकाळ डिजिटल टीम

चीनमुळे (china) आणखी एक संकट जगावर येऊ घातलं आहे. चीनचे एक रॉकेट (rocket) कोणत्याही क्षणी अनियंत्रित पद्धतीने जमिनीवर पडू शकते.

नवी दिल्ली- चीनमुळे (china) आणखी एक संकट जगावर येऊ घातलं आहे. चीनचे एक रॉकेट (rocket) कोणत्याही क्षणी अनियंत्रित पद्धतीने जमिनीवर पडू शकते. हा रॉकेटचा मुख्य भाग म्हणजे कोर आहे. याची लांबी जवळपास १०० फूट आहे, तर वजन २१ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात चीनचे एक रॉकेट पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरात पडलं होतं. पश्चिम आफ्रिकेतील एक गाव रॉकेटमुळे उद्धवस्त झाले होते. सुदैवाने या गावात कोणी राहात नव्हतं. (Long March 5B rocket Chinese space station module crashing earth china control lost)

चीनचे हे रॉकेट पृथ्वीच्या नेमक्या कोणत्या भागात पडेल, याबाबत निश्चितता नाही. त्यामुळे अनेक देशांनी सतर्कता घेतली आहे. चीनच्या या रॉकेटचं नाव आहे, लॉन्ग मार्च ५बी वाय२ (Long March 5B Y2 Rocket).सध्या हे रॉकेट लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फेऱ्या मारत आहे. याचा अर्थ जमिनीपासून १७० किलोमीटर ते ३७२ किलोमीटर उंचीवर हे रॉकेट फिरत आहे. याचा वेग 25,490 किलोमीटर प्रति तास म्हणजे ७.२० किलोमीटर प्रति सेकंद आहे. रॉकेटची उंची १६ फूट आहे. त्यामुळे हे रॉकेट जमिनीवर पडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

चीनने हे रॉकेट २८ एप्रिलला तियानहे स्पेस स्टेशन (Tianhe Space Station) बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. एक मॉड्यूल घेऊन रॉकेट स्पेस स्टेशनमध्ये गेले. मॉड्यूयला निर्धारित कक्षेत सोडण्यात आल्यानंतर याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर यायचे होते. पण, चीनच्या स्पेस एजेन्सीचे या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे. शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केलीये, की हे रॉकेट कधी जमिनीवर कोसळेल सांगता येत नाही. शिवाय रहिवाशी भागात हे रॉकेट पडण्याची शक्यता आहे. रॉकेटची गती लक्षात घेता यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. १० मेपर्यंत रॉकेट जमिनीवर पडेल, असं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT