२२ वर्षांपूर्वी हरवला, गूगलच्या मदतीने सापडला 
ग्लोबल

२२ वर्षांपूर्वी हरवला, गूगलच्या मदतीने सापडला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये २२ वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीला गूगलच्या मदतीने शोधण्यात आले आहे. विलियम मोल्ड्ट असे या व्यक्तीचे नाव असून, १९९७ च्या ७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून तो हरवलेला होता. त्या दिवशी तो रात्री क्लबमध्ये गेला. मात्र, पुन्हा घरी परतलाच नाही. त्यावेळी विलियम ४० वर्षांचा होता.

कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देऊनही विलियम आजपर्यंत सापडला नव्हता. मात्र, अलीकडेच स्थानिक पोलिसांना एका व्यक्तीने फोन करत, अज्ञात कारची माहिती दिली. जी त्याला आपल्या परिसरातील तलावात बुडालेली दिसली. जमिनीचे सर्वेक्षण करणाऱ्या या व्यक्तीला सर्वेक्षणादरम्यान ही कार आढळून आली. या कारमध्ये मानवी सांगाडा सापडला आहे. जो विलियमचा होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार २००८ मध्ये ही कार गूगल अर्थच्या प्रतिमेत दिसून आली होती, मात्र, त्यावेळी तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. 

ही पहिलीच घटना नाही
एखाद्या व्यक्तीला गूगल अर्थच्या मदतीने शोधण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही भारतात पोलिसांनी गूगल अर्थच्या मदतीने एका व्यक्तीला शोधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT