Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, चेन्नई दौरा रद्द; डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्ली ते मुंबई राजकीय हालचालींना वेग

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीसाठी चेन्नईला रवाना झाले असताना, प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे चेन्नईला गेले नाहीत; मात्र मुंबईत शरद पवारांच्या भेटीला ते उपस्थित राहणार आहेत.
Uddhav Thackeray cancels Chennai visit amid Delimitation Bill row!

Uddhav Thackeray cancels Chennai visit amid Delimitation Bill row!

Sakal

Updated on: 

केंद्र सरकारच्या बहुचर्चित मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकावरून राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला चेन्नई दौरा रद्द केला आहे. सोमवारी (३० नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते रविवारी (२९ नोव्हेंबर) चेन्नईत दाखल झाले; मात्र प्रकृतीच्या कारणास्तव आपण चेन्नईला प्रवास करू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...