maine shooting suspect of killing 22 people found dead US Shooting Marathi news  
ग्लोबल

US Shooting : लेविस्टनमध्ये 22 जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा मृतदेह सापडला, पोलिसांना वेगळाच संशय

रोहित कणसे

अमेरिकेच्या मेन (Maine) स्टेटच्या लेविस्टन शहरात बुधवारी रात्री बेछूट गोळीबारात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. तेव्हापासून संशयित आरोपी हल्लेखोराचा शोध घेतला जात होता. मात्र आता या हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला होता आणि त्याचा शोध घेतला जात होता. दोन दिवसांनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना आरोपी मृत आढळला आहे. याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही, मात्र अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.

यापूर्वी, सुरक्षा अधिकार्‍यांनी फेसबुकवर संशयित हल्लेखोराचे रायफलसह दोन फोटो शेअर केले होते आणि संशयिताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४० वर्षीय रॉबर्ट कार्डचा मृतदेह लुईस्टनपासून आठ मैल दूर जंगलात सापडला आहे. हा मृतदेह एका रीसायकलींग सेंटरजवळ सापडला . सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, ही घटना घडल्यानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटनेच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारी अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्यांची ओळख पटवली, ज्यात एक ७० वर्षीय जोडप्यापासून ते एका १४ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेने दक्षिण मेनमधील या शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT