ग्लोबल

हृदयद्रावक! सुरक्षारक्षकाच्या अन्नाचं ताट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शर्वरी जोशी

बेरोजगारी आणि गरिबी ही आजच्या काळातली सर्वात मोठी समस्या आहे. एकीकडे सगळ्या देशांमध्ये अर्थव्यवस्थेचा आलेख चढत आहे. तर दुसरीकडे मात्र, अजुनही बेरोजगारी व गरिबी कमी झालेली दिसत नाही. भूकबळी, उपासमार, कुपोषण अशा अनेक समस्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या किंवा त्रासलेल्या अनेकांचे व्हिडीओ, फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.  यामध्येच सध्या परिस्थितीने गांजलेल्या एका सुरक्षा रक्षकाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. 

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला फोटो मलेशियामधील असून यात परिस्थितीने गांजलेला एक सुरक्षा रक्षक दिसून येत आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा सुरक्षारक्षक भात, कांदा आणि लसूण असं जेवतांना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एपिड लीड या व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला असून तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ते इतकं साधं जेवणं का जेवतात यामागचं कारणही एपिडने सांगितलं.

व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीचं कुटुंब एका गावात राहत असून ते अत्यंत साधेपणाने आयुष्य जगतात. त्यामुळे ते त्यांच्या पगारातील अर्धी रक्कम कुटुंबासाठी पाठवतात. तसंच हे असं साध्या पद्धतीचे जेवण जेवून जे इतर पैसे वाचतील ते  कुटुंबासाठीच पाठवायचे असतात. त्यामुळे ते कायमच असं साधं जेवण जेवतात. 

दरम्यान, आतापर्यंत हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून त्याच्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT