ग्लोबल

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींवर हल्ला, बॉम्ब स्फोटात जखमी

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून सांगितलं की, गुरुवारी सायंकाळी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर हल्ला झाला.

सकाळ डिजिटल टीम

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून सांगितलं की, गुरुवारी सायंकाळी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर हल्ला झाला.

माले - मालदीवचे (Maldives) माजी राष्ट्रपती आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद (Mohammad Nasheed) हे गुरुवारी रात्री बॉम्बस्फोटात जखमी झाले. घराजवळच ही घटना घडली असून याची माहिती मंत्री अहमद महलोफ यांनी दिली. महलोफ म्हणाले की, नशीद हे बॉम्बस्फोटात जखमी झाले आहेत. मात्र त्यांना किती दुखापत झाली याची माहिती मिळालेली नाही. नशीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S jaishankar) यांनी म्हटलं की, अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारताला काळजी वाटते. नशीद लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना करतो.

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. राजधानी मालेमध्ये घटनास्थळासह परिसरात सर्वसामान्य नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नशीद यांनी 30 वर्षानंतर द्वीपसमुह राज्याचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडणून आलेले नेते बनले होते. त्यांनी 2008 ते 2012 पर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. नशीद हे मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य आहेत.

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून सांगितलं की, गुरुवारी सायंकाळी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना आमच्या समाजात कोणतंही स्थान नाही. माजी राष्ट्रपती नशीद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायर लझाले आहेत. यामध्ये एक दुचाकी तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. नशीद यांच्यावर झालेला हल्ला का आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT