Man dating transgender Sakal
ग्लोबल

Man Dating Transgender : महिला समजून तृतीयपंथीला करत होता डेट; सत्य समोर येताच इंटरनेटवर...

"आधीही मला अनेक ट्रान्स महिलांनी डेटिंगसाठी विचारलं होतं, पण मी त्यांना सतत रिजेक्ट करायचो."

वैष्णवी कारंजकर

आपण ज्या महिलेला डेट करत होतो, ती व्यक्ती तृतीयपंथी असल्याचं एका व्यक्तीने सांगितलं आहे. त्याने इंटरनेटवर ही गोष्ट शेअर करत मदतही मागितली आहे.

जोश नावाच्या एका व्यक्तीने नेटकऱ्यांना आपली शंका विचारली आहे. आपण आता आपल्या मनातल्या गोष्टी त्या महिलेला कशा सांगाव्यात, असा प्रश्न जोशला पडला आहे. जोशने सांगितलं की, तो या महिलेसोबत अनेकदा डेटवर गेला आहे आणि त्या दोघांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला आहे. मात्र त्यानंतर महिलेने जोशला सांगितलं की ती एक पुरुष म्हणून जन्माला आली होती.

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, जोश म्हणाला की, पुरुषाने लिंगबदल करून महिला बनणं या गोष्टीचं आधी तो समर्थन करत नव्हता. मात्र, त्यानंतर त्याला जाणवलं की जोशलाही ती महिला आपल्या आयुष्यामध्ये हवी आहे. आपल्याला तिच्यासोबत एक वेगळाच बंध निर्माण झाल्याचं जाणवत आहे. तसंच आपण त्या महिलेकडे आकर्षित होत आहोत.

तो पुढे म्हणाला की, मी आता हे स्विकारलं आहे की ती एक महिला आहे. पण जेव्हा तिला मला काय आवडतं, काय नाही आवडतं हे सांगितलं, तेव्हा तिला थोडं अवघडल्यासारखं वाटतं. त्यानंतर ती मला म्हणाली की, मला वाटत नाही, आपलं नातं पुढे टिकेल. मी तिला सांगितलं होतं की, मला अशा प्रकारे पुरुषाने लिंगबदल करून स्त्री होणं मला पटत नाही. त्यानंतर तिने आपलं सत्य मला सांगितलं.

जोश पुढे म्हणाला की, तिला गमावण्याच्या भीतीने आपल्याला फार दुःख होतं. आता सत्य काय आहे ते मला कळलं आहे. आधीही मला अनेक ट्रान्स महिलांनी डेटिंगसाठी विचारलं होतं, पण मी त्यांना सतत रिजेक्ट करायचो. मला त्यांना स्विकारता यायचं नाही. पण आता या अनुभवानंतर माझे डोळे उघडले आणि मला असं वाटतंय की मी आधी ज्या महिलांना रिजेक्ट केलं, त्यावेळी मी चुकलो होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT