Hamburg airport 
ग्लोबल

Hamburg Airport: जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीचा गोळीबार, सर्व उड्डाणे रद्द

Sandip Kapde

जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीने गोंधळ घातला. त्याने एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाने सर्व विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग रद्द केले आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा एका व्यक्ती बॅरियरमधून कारने हॅम्बर्ग विमानतळाच्या मैदानात घुसला. त्याने आपल्या शस्त्रातून हवेत दोनदा गोळीबार केला. या घटनेनंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सामान घेऊन इकडून तिकडे धावू लागले.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी विमानतळाला वेढा घातला आणि गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. या काळात विमानतळावरून चालणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की ज्या प्रवाशांना या घटनेचा फटका बसला आहे ते थेट एअरलाइनशी संपर्क साधू शकतात. (Latest Marathi News)

या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी दिली माहिती दिली की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सध्या टेकऑफ आणि लँडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. ही घटना जर्मन वेळेनुसार रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार 12.30 वाजता) घडली.

घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, गोळीबार केल्यानंतर त्या व्यक्तीने कारमधून दोन जळत्या बाटल्याही फेकल्या होत्या. (Latest Global News)

सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने कारच्या आत काही लोकांना ओलीस ठेवल्याचा विश्वास असल्याने ते मोठी कारवाई करणार आहेत. विमानतळ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे 27 उड्डाणे प्रभावित झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

मंत्र्यांसमोरच ऑपरेटरने मागितली ५० हजाराची लाच, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

SCROLL FOR NEXT