Man who kissed reporter on live TV charged with harassment 
ग्लोबल

Video : लाईव्ह वार्तांकनादरम्यान त्याने केला किस...

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : महिला पत्रकार लाईव्ह वार्तांकन करत असताना एकाने जवळ येऊन किस केला. किस केल्यानंतरही महिला पत्रकाराने आपले वार्तांकन पूर्ण केले. किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेतील लुइव्हिल शहरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी किस करणाऱया युवकाविरोधात महिला पत्रकाराने तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्याने माफी मागितल्यानंतर महिला पत्रकाराने त्याला माफ केले आहे.

महिला पत्रकार सारा रिव्हेस्ट या एका चॅनेलसाठी लाईव्ह वार्तांकन करत होत्या. यावेळी एरिक गुडमॅन नावाचा युवक त्यांच्याजवळ आला व त्याने कॅमेऱयासमोर त्यांच्या गालाला किस केला. यामुळे काही क्षण सारा या गोंधळून गेल्या. परंतु, तत्काळ त्यांनी स्वतःला सावरत लाईव्ह वार्तांकन सुरूच ठेवले होते. मात्र, किस केल्यानंतर एरिक निघून गेला. वार्तांकन संपल्यानंतर सारा यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवाय, त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एरिकनेही तो पाहिला. यानंतर तो म्हणाला, 'मी बॅचलर पार्टी करण्यासाठी जात होतो. त्यावेळी मी थट्टा-मस्करीच्या मूडमध्ये होतो. माझ्याकडून ही चूक झाली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका पत्रकाराचं काम किती कठीण असते, याचा मला अंदाज आला. तुमच्या कामात मी व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व.'

दरम्यान, एरिकने मागितलेल्या माफीनंतर सारानेही त्याला माफ केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

SCROLL FOR NEXT