Musk Sakal
ग्लोबल

Elon Musk : ट्वीटरची डील फसल्यानंतर आता मस्कचा डोळा मँचेस्टर युनायटेडवर? दिले संकेत

ट्विटरवर, टेस्लाचे प्रमुख खरोखरच हा फुटबॉल क्लब विकत घेणार का? याबद्दल प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Elon Musk : ट्वीटर खरेदीमुळे चर्चेत आलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मंगळवारी ट्विट करत एका नव्या खरेदीचे संकेत दिले आहे. यामध्ये त्यांनी आपण इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड पीएलसी विकत घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही. त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक चर्चांना उधाण आले असून, ट्विटरवर, टेस्लाचे प्रमुख खरोखरच हा फुटबॉल क्लब विकत घेणार का? याबद्दल प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला आहे.

मस्क यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, हे अगदी स्पष्ट आहे की, मी अर्ध्या रिपब्लिकन पक्षाला आणि अर्ध्या डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देतो. या ट्विटनंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये लिहिले की, मी मँचेस्टर युनायटेड खरेदी करत आहे, तुमचे स्वागत आहे. मस्कच्या या ट्विटवर यूजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

डीलबाबत किती गंभीर?

एलोन मस्क अनेकदा असे ट्विट करतात, ज्यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय बनतात. आता त्यांनी ट्विटरवर मँचेस्टर युनायटेडला विकत घेण्याची घोषणा केली आहे, परंतु यावेळी ते या खरेदीसाठी किती गंभीर आहेत याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ट्विटरसोबतचा करार संपुष्टात

इलॉन मस्कने अलीकडेच सोशल मीडिया साइट ट्विटरशीदेखील खेरदी करार तोडला आहे. याआधी त्यांनी ट्विटरसोबत मोठी डील केली होती. मात्र, नंतर ते या करारातून बाहेर पडले. याबाबत ट्विटरने मस्कविरोधात खटलाही दाखल केला आहे. अब्जाधीश मस्क या करारातून बाहेर पडण्यासाठी स्पॅम अकाउंटचा मुद्दा समोर करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT