Marathi news international news in Marathi China North Korea Conflict 
ग्लोबल

चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध

सकाळवृत्तसेवा

बीजिंग : उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. तसेच, उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. अणु चाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरुन दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.

उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो. चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे. उत्तर कोरियाने अणु चाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत. चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ठरावावाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार द्रवरुप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात आजपासून थांबविण्यात आली आहे. तसेच, कच्चा तेलाची आयात 1 ऑक्‍टोबरपासून मर्यादित करण्यात येईल. उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवरील बंदी आजपासून लागू होईल.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांकडून उत्तर कोरियाला होणारी कच्च्या तेलाची निर्यात मर्यादित करण्यात आली आहे. ही निर्यात ऑक्‍टोबरपासून चालू वर्षअखेरपर्यंत पाच लाख बॅरल असेल आणि पुढील वर्षीपासून ती दर वर्षाला 20 लाख बॅरल असेल. उत्तर कोरियाने याचा वापर फक्त नागरी कामकाजासाठी करावा, अशीही अट घालण्यात आली आहे.

आर्थिक नाकेबंदी होणार 
जागतिक दबावामुळे चीनने उत्तर कोरियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. याचबरोर उत्तर कोरियाचे चीनमधील बॅंकांमार्फत होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहारही थांबणार आहेत. या निर्णयामुळे उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी होणार आहे. चीनने बॅंकांना उत्तर कोरियाशी व्यावसायिक संबंध तोडण्याचे निर्देश दिले होते. याचे स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT