Xi Jinping 
ग्लोबल

मसूद अजहरप्रकरणी चीन भूमिकेवर ठाम 

वृत्तसंस्था

बीजिंग : जैशे मोहंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला चीनने आपला विरोध अद्याप कायम ठेवला आहे.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाबाबत अजूनही एकमत झाले नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि पाकिस्तानने याबाबत चर्चा करावी, असे म्हटले आहे. 

अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे भारताने आवाहन केल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने यासंदर्भात सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, फेब्रुवारीत चीनने या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला. त्यानंतर पुन्हा अमेरिकेने हा प्रस्ताव आणला. मात्र, ऑगस्टमध्ये चीनने पुन्हा खोडा घातला. तीन महिन्यांसाठी हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला. आता त्याची मुदत संपत असताना चीनने आपल्या भूमिकेचा आज पुनरुच्चार केला.

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, तांत्रिक कारणाच्या आधारावर चीनने अजहर प्रकरणात हस्तक्षेप केला होता. या भूमिकेवर अजूनही चीन ठाम आहे. अर्थात, सुरक्षा परिषदेतील 15 पैकी 14 देश या प्रस्तावाच्या बाजूने आहेत, मात्र चीनने या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने घोडे अडले आहे.

सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांची मंजुरी असणे बंधनकारक आहे. जर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले तर त्याच्या प्रवासावर आणि मालमत्तेवर टाच येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT