Nirav Modi 
ग्लोबल

नीरव मोदीची कंपनी विकत घेण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवून परदेशात पळ काढलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याची अमेरिकेतील कंपनी विकत घेण्यासाठी संभाव्य खरेदीदारांनी उत्सुकता दर्शविली आहे. 'फायरस्टार डायमंड' या मोदीच्या कंपनीने 26 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला. 

भारतात 11 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्‍सी हे दोघे जानेवारीमध्येच देशातून बाहेर गेले. त्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर दोघांनीही 'आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही' अशी भूमिका घेतली आहे. पण नीरव मोदीच्या बहुतांश मालमत्तांवर भारतामध्ये जप्तीची कारवाई झाली आहे. भारतात दाखल झालेल्या तक्रारीमध्ये 'फायरस्टार डायमंड'चा उल्लेख नाही. 'ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदारांनी ठोस इच्छा व्यक्त केली आहे', असे 'फायरस्टार डायमंड'ने अमेरिकी न्यायालयासमोर सादर केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे. 'फायस्टार'ची वार्षिक उलाढाल 5.9 अब्ज रुपयांपर्यंत आहे. 

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पंजाब नॅशनल बँकेचे सात कर्मचारी आणि मोदी-चोक्‍सी यांच्या कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याशिवाय, मोदी आणि चोक्‍सी यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या आहेत. 

'या प्रकरणी भारतातील संबंधित कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. 'फायरस्टार'चे बहुतांश उत्पादन या कंपन्यांमधून होत असे; शिवाय भारतातील कंपन्यांमधून 'फायरस्टार'चे कार्यालयीन कामकाजही होत असे. आता ही कार्यालये अचानक बंद झाल्यामुळे 'फायरस्टार'च्या दैनंदिन कामकाजावर आणि व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे', असेही 'फायरस्टार'ने अर्जात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT