Mumbai High court
Esakal
छत्रपती संभाजीनगर - जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने अभियांत्रिकी पदवीचा प्रवेश धोक्यात आलेल्या आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) मधील सिव्हिल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश देण्याचे निर्देश राज्य सीईटी सेलला देण्यात आले आहेत.