Margaret-Keenan 
ग्लोबल

पहिली लस नव्वदीतील आजींना; ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात

पीटीआय

लंडन - कोरोना प्रतिबंधासाठी जगातील पहिली लसीकरण मोहिम ब्रिटनमध्ये आज सुरु झाली. मार्गारेट किनन या नव्वद वर्षांच्या आजी लस टोचवून घेणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला मंजुरी दिली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रिटनमधील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लसीकरण मोहिम आहे. आज सकाळी साडे सहालाच मार्गारेट किनन यांना स्थानिक रुग्णालयात लसीचा डोस देण्यात आला. हा ऐतिहासीक क्षण असल्याचे ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हीसने (एनएचएस) म्हटले आहे. मार्गारेट यांचा पुढील आठवड्यात ९१ वा वाढदिवस आहे. ‘लस टोचवून घेतलेली पहिली व्यक्ती ठरल्याबद्दल मला आनंद होत आहे. माझ्या वाढदिवसाची ही भेटवस्तूच आहे. माझ्या कुटुंबाबरोबर नाताळसह आणखी काही महत्त्वाचे क्षण साजरे करण्याबाबत मला आता विश्‍वास वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी लस घेतल्यानंतर दिली. त्यांना २१ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. एका ज्वेलरीच्या दुकानात त्या वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत काम करत होत्या. आपल्या मुला-सुना-नातवंडांबरोबर पुन्हा एकदा लवकरच बाहेर फिरायला जाण्याची त्यांची इच्छा आहे. इतरांनीही लस टोचवून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘एनएचएस’ने ब्रिटनमधील संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींची यादी आधीपासूनच तयार ठेवली होती आणि लस देताना त्यांनाच प्राधान्य दिले आहे. ८० च्या पुढे वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवकांना आधी लस दिली जाणार आहे. या यादीत नऊ नातवंडाचे आजोबा असलेल्या हरी शुक्ला (वय ८७) या भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. त्यांनाही आज सकाळी लसीचा डोस देण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT