new-zealand-firing 
ग्लोबल

अंधाधुंद गोळीबारातून बांग्लादेशी क्रिकेट संघ थोडक्यात वाचला

वृत्तसंस्था

वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघ थोडक्यात बचावला आहे. 

दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून, त्यांना मानसिक धक्का बसल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

stuff.co.nz या संकेतस्थळाने एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिले असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचे सांगितले. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असेही त्यांनी सांगितले.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT