Russia Ukraine War  eSakal
ग्लोबल

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाच्या सैन्यस्थळावर क्षेपणास्त्र हल्ला; भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल

सुमारे दोन मिनिटांपर्यंत हे स्फोट सुरू होते.

Sudesh

युक्रेनने बुधवारी रशियाच्या एका सैन्यस्थळावर मोठा हल्ला केला. युक्रेनमध्येच असणाऱ्या माकिव्हका या शहरावर रशियाने ताबा घेतला होता. याठिकाणी रशियाने आपले मिलिटरी बेस तयार केले होते. या बेसवर युक्रेनच्या सैन्याने क्षेपणास्त्र हल्ला केला. (Russia Ukraine War)

या हल्ल्यामुळे भीषण स्फोट झाले. सुमारे दोन मिनिटांपर्यंत हे स्फोट सुरू होते. यामध्ये रशियाच्या सैन्यस्थळावर असणारा तेलसाठा आणि हत्यारे नष्ट झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने यासाठी अमेरिकेकडून घेतलेल्या HIMRAS या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

पहिल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हत्यारांचा साठा असलेल्या इमारतीत स्फोट झाला. यानंतर काही क्षणांतच ऑईल ठेवलेल्या इमारतीत स्फोट झाला. यानंतर हवेत मशरूमच्या आकाराचा धुराचा लोट दिसून येत होता. या स्फोटांचे हादरे कित्येक किलोमीटरपर्यंत जाणवले. (Ukraine attacks)

या स्फोटांनंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यानंतर सैन्य स्थळावर कित्येक वेळ छोटे-छोटे स्फोट होत राहिले.

रशियाचं प्रत्युत्तर

यानंतर रशियानेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या एका शहरावर (City of Lviv) हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुमारे सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त गार्डियनने दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

SCROLL FOR NEXT